एक संध्याकाळ

एक संध्याकाळ

एक संध्याकाळ
सप्तसुरांची
जुन्या गितांची
रंगून जाण्याची
एक संध्याकाळ
उदास मनाची
जुन्या आठवणींची
हरवून जाण्याची
एक संध्याकाळ
वाट बघण्याची
वेडावून जाण्याची
तुझ्या आठवणींची
एक संध्याकाळ
क्षितीजा पलीकडची
रीत्या मनाची
निसटत्या क्षणांची
एक संध्याकाळ
समुद्राकाठची
उसळत्या लाटांची
मोहरुन जाण्याची
एक संध्याकाळ
तुझी नी माझी
स्वप्ने बघण्याची
धुंद होउन जाण्याची
एक संध्याकाळ
फक्त माझी
मिटल्या ओठांची
शांत मनाची
अंतर्मुख होण्याची.

2 comments:

Maahesh Deshmukh said...

छान . साधी सोपी भाषा. त्यात कोणताही अवजद शब्दांचा बडेजाव नाही.

सौ. मंगल अशोक कुदळे said...

धन्यवाद! आपल्याला कविता आवडली ऐकूण आनंद वाटला.

Post a Comment

Design by Blogger Templates