एक संध्याकाळ

एक संध्याकाळ

एक संध्याकाळ
सप्तसुरांची
जुन्या गितांची
रंगून जाण्याची
एक संध्याकाळ
उदास मनाची
जुन्या आठवणींची
हरवून जाण्याची
एक संध्याकाळ
वाट बघण्याची
वेडावून जाण्याची
तुझ्या आठवणींची
एक संध्याकाळ
क्षितीजा पलीकडची
रीत्या मनाची
निसटत्या क्षणांची
एक संध्याकाळ
समुद्राकाठची
उसळत्या लाटांची
मोहरुन जाण्याची
एक संध्याकाळ
तुझी नी माझी
स्वप्ने बघण्याची
धुंद होउन जाण्याची
एक संध्याकाळ
फक्त माझी
मिटल्या ओठांची
शांत मनाची
अंतर्मुख होण्याची.

माझी पुस्तके

माझी पुस्तके

1. सुलक्षणा - (कथासंग्रह, 2000)
2. उनसावली - (कथासंग्रह, 2000)
(कलायात्री प्रकाशन, मुंढवा, पुणे, मो. 9421075235)
3. शब्दांकन, कुर्यात सदा मंगलम, लेखक आदेश बोरावके
(विवाह विषयक मार्गदर्शन करणारे पुस्तक)

पुरस्कार





मनोगत

मनोगत

उन सावली हा माझा पहिलाच काव्य संग्रह आहे. रोजच्या जीवनात काही प्रसंग मनाला स्पर्श करून जातात, हृदयात घर करून राहतात, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ही काव्य दिसू लागते. सुख आणि दुखः दोन्हीवर ही कविता लिहिता येते. माणसाचं आयुष्याचं मुळ उन सावल्यांचा खेळ आहे.


आई

आई

सायंकाळी
कातरवेळी
चिमणी पाखरे
घराकडे परतती
त्यावेळी मला
तुझी आठवण येते.
अंगणातली गाय
बघून पाडसाला
जेव्हा हंबरते
त्यावेळी मला
तुझी आठवण येते.
सोनुली माझी
लागे रडू
तिला घास भरवते
त्यावेळी मला
तुझी आठवण येते.
येई सांगावा आईचा
सखी शेजारीण
माझी
माहेरी निघते
त्यावेळी मला
तुझी आठवण येते.
घाव बसे मर्मावर
शब्द बोचती
काट्यासम
डोळे आसवे
गाळती
त्यावेळी मला
तुझी आठवण येते.
होई दुःखाचा उद्रेक
बोल जिव्हारी लागते
हवे धीराचे
दोन शब्द
आई तुझी
आठवण येते
तुझी आठवण येते.

मनाच्या पाखरा

मनाच्या पाखरा

माझ्या मनाच्या पाखरा
उगी बस तू रे जरा
मारू नकोस येरझरा
आठव तू रे परमेश्वरा
माझ्या मनाच्या पाखरा
विचार सोड तू अघोरी
बसुनी एका जागेवारी
वाच तू रे ज्ञानेश्वरी

वेदना

वेदना

वेदना मनाची
वेदना हृदयाची
नसे डोळ्यात पानी
दिसे ओठावरी हसू
नाही कुणा कळायाची

श्री

श्री
हां माझा पहिला ब्लॉग आहे !!

Design by Blogger Templates