Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts
कविता - तुळस
तुळस
आठवतेस मला तू
तुरू तुरू चालणारी
दुडू दुडू धावणारी
गोबऱ्या गालांची
कुरळ्या केसांची
बोबडे बोल बोलणारी
पारिजातकाची फुले
दोघींनी वेचली
दमलो जरी खेळून
नाही आली दुखनी
मिळालेला खाऊ दोघींनी घेतला
एकीने दुसरीचा द्वेष नाही केला
आई रागावली तरी
नाही केली गाऱ्हाणी
बसे एकीला मार
दुसरीच्या डोळा पाणी
झोक्यावर बसून
गायली गं गाणी
एकीने दुसरीची
केली वेणीफणी
लोक म्हणती येताजाता
पोरी कोणाच्या गोजीरवाण्या ?
आजी गर्वाने म्हणे
नाती माझ्या गं देखण्या
गूजगोष्टी गं केल्या
ऐकल्या आजीच्या कहाण्या
माय कौतुकाने बोले
लेकी माझ्या गं शहाण्या
कसला गं जन्म हा
कशासाठी गं आटापिटा
होता वयाने मोठे
दोघींच्या गं दोन वाटा
माझ्या पाठच्या बहिणी
तुझ्या भेटीची गं लागे आस
दिसता अंगणी तुळस
होतो मला तुझा भास.
Posted at 7:41 AM | Labels: उन सावली, कविता, नाती | 4 Comments
दोन जीवांची नाती
दोन जीवांची नाती
दोन जीवांची नाती
सांगे विश्वाची महती
दोन जीव हे वेगवेगळे
दोन ठिकाणी जन्म घेती
परी एकत्र नांदती
सांगे विश्वाची महती || दोन जीवांची नाती ... १
कोण कोठला 'तो' अन्
कोण कोठली 'ती'
एकमेका साथ देती
सांगे जीवाची महती || दोन जीवांची नाती ... २
कधी रडणे कधी रूसवा
कधी भांडण कधी अबोला
परी एकमेकाविना न राहती
सांगे जीवाची महती || दोन जीवांची नाती ... ३
कधी भासती राधा कृष्ण
विष्णू लक्ष्मीही कधी वाटती
भासती कधी कैलास पार्वती
सांगे विश्वाची महती || दोन जीवांची नाती ... ४
संसार रथाची दोन चक्रही
मानूनी बंधने युगयुगांची
एकमेका सवे चालती
सांगे विश्वाची महती || दोन जीवांची नाती ... ५
Posted at 8:21 PM | Labels: उन सावली, कविता, नाती | 0 Comments
एक संध्याकाळ
एक संध्याकाळ
| एक संध्याकाळ सप्तसुरांची जुन्या गितांची रंगून जाण्याची | |
| एक संध्याकाळ उदास मनाची जुन्या आठवणींची हरवून जाण्याची | |
| एक संध्याकाळ वाट बघण्याची वेडावून जाण्याची तुझ्या आठवणींची | |
| एक संध्याकाळ क्षितीजा पलीकडची रीत्या मनाची निसटत्या क्षणांची | |
| एक संध्याकाळ समुद्राकाठची उसळत्या लाटांची मोहरुन जाण्याची | |
| एक संध्याकाळ तुझी नी माझी स्वप्ने बघण्याची धुंद होउन जाण्याची | |
| एक संध्याकाळ फक्त माझी मिटल्या ओठांची शांत मनाची अंतर्मुख होण्याची. |
Posted at 12:44 AM | Labels: कविता, संध्याकाळ | 2 Comments
आई
आई
सायंकाळी
कातरवेळी
चिमणी पाखरे
घराकडे परतती
त्यावेळी मला
तुझी आठवण येते.
अंगणातली गाय
बघून पाडसाला
जेव्हा हंबरते
त्यावेळी मला
तुझी आठवण येते.
सोनुली माझी
लागे रडू
तिला घास भरवते
त्यावेळी मला
तुझी आठवण येते.
येई सांगावा आईचा
सखी शेजारीण
माझी
माहेरी निघते
त्यावेळी मला
तुझी आठवण येते.
घाव बसे मर्मावर
शब्द बोचती
काट्यासम
डोळे आसवे
गाळती
त्यावेळी मला
तुझी आठवण येते.
होई दुःखाचा उद्रेक
बोल जिव्हारी लागते
हवे धीराचे
दोन शब्द
आई तुझी
आठवण येते
तुझी आठवण येते.
Posted at 2:48 AM | Labels: उन सावली, कविता, नाती | 2 Comments
मनाच्या पाखरा
मनाच्या पाखरा
माझ्या मनाच्या पाखरा
उगी बस तू रे जरा
मारू नकोस येरझरा
आठव तू रे परमेश्वरा
माझ्या मनाच्या पाखरा
विचार सोड तू अघोरी
बसुनी एका जागेवारी
वाच तू रे ज्ञानेश्वरी
Posted at 7:46 PM | Labels: उन सावली, कविता, मन | 0 Comments
वेदना
वेदना
वेदना मनाची
वेदना हृदयाची
नसे डोळ्यात पानी
दिसे ओठावरी हसू
नाही कुणा कळायाची
Posted at 1:06 AM | Labels: उन सावली, कविता, मन | 0 Comments
Subscribe to:
Posts (Atom)